VIDEO : तेथून सुरू झाला लेखकाचा प्रवास.. जेष्ठ लेखक डॉ. जोशी यांनी बाबासाहेबांच्या आठवणींना दिला उजाळा - Ambedkar jayanti Senior Writer Joshi memories
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१ वी जयंती आहे. देशभरात मोठ्या उत्साहात ती साजरी केली जात आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपण ओळखतो. बाबासाहेबांनी प्रत्येक विषयावर सखोल चिंतन व अभ्यास केला. आपल्या विचारांना विविध चळवळी व आंदोलनाच्या माध्यमातून मूर्त रूप दिले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींना उजाळा देत असताना पुण्यातील ज्येष्ठ लेखक डॉ. न.म. जोशी ( Senior Writer Joshi on Babasaheb Ambedkar ) यांनी डॉ. आंबेडकर यांच्याबरोबर झालेली भेट, तसेच अनेक आठवणींना उजाळा दिला. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पुण्याबरोबर असलेल्या अनेक आठवणींना उजाळा यावेळी डॉ. न.म. जोशी यांनी दिला.