ETV Bharat / state

नांदेडच्या तरुणानं फुलवली स्ट्रॉबेरी शेती; वर्षाला लाखोंचं उत्पन्न - NANDED STRAWBERRY FARMING

नांदेडच्या बारड इथल्या तरुण शेतकऱ्यानं उच्च शिक्षण घेऊन आधुनिक शेतीची कास धरली आहेत. गेल्या पाच वर्षापासून बालाजी उपवार यांनी स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग यशस्वी केलाय.

NANDED STRAWBERRY FARMING
उच्च शिक्षित शेतकरी बालाजी उपवार (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 13, 2025, 4:15 PM IST

Updated : Feb 13, 2025, 7:04 PM IST

नांदेड : नांदेडच्या बारड इथल्या बीएस्सी ऍग्री झालेल्या बालाजी उपवार या तरुणानं उच्च शिक्षण घेऊन आधुनिक शेतीची कास धरली आहे. गेल्या पाच वर्षापासून तरुण शेतकऱ्यानं स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. दहा गुंठ्यावर स्ट्रॉबेरी शेती करून सहा लाखाचं उत्पन्न हा शेतकरी घेत आहे.

बाजारात स्ट्रॉबेरीला प्रचंड मागणी : बालाजी उपवार या तरुणानं आपल्या शेतातील स्ट्रॉबेरी स्वतः विकल्यामुळं त्याच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. श्री बालाजी ऑरगॅनिक स्ट्रॉबेरी या नावानं स्वतः माल थेट ग्राहकांना विकला जातो. यामुळं सर्वसामान्य लोकांपर्यंत कमी किंमतीत ऑरगॅनिक स्ट्रॉबेरी मिळते.

नांदेडच्या तरुणानं फुलवली स्ट्रॉबेरी शेती (ETV Bharat Reporter)

स्टॉल लावून स्ट्रॉबेरीची विक्री : स्ट्रॉबेरीची लागवड केल्यानंतर दोन महिन्यानंतर पीक काढण्यात येतं. यानंतर बालाजी भोकर रस्त्यावर स्वतः स्टॉल लावून श्री बालाजी ऑरगॅनिक स्ट्रॉबेरी या नावानं स्ट्रॉबेरीची विक्री करतात. यासह शहरामध्ये जाऊन ते स्ट्रॉबेरीची विक्री करतात. त्यामुळं थेट शेतकरी ते ग्राहक स्ट्रॉबेरीची विक्री केली जात आहे. महाबळेश्वर-चिखलदरा अशा ठिकाणी महाराष्ट्रात प्रामुख्यानं स्ट्रॉबेरीची शेती आपल्याला पहायला मिळते. मात्र, मराठवाड्यातील तरूण शेतकऱ्यानं स्ट्रॉबेरी शेतीचा केलेला प्रयोग आता इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

स्ट्रॉबेरीतून उत्पन्न किती? : प्रतिकिलो 400 रुपये दराने स्ट्रॉबेरीची विक्री होते. ग्राहकांना शेतकऱ्याकडून ताजी स्ट्रॉबेरी मिळत असल्यानं ग्राहक स्ट्रॉबेरीची खरेदी करतात. "स्ट्रॉबेरीची लागवड करण्यासाठी सुमारे दोन लाख रूपये खर्च आला असून, आत्तापर्यंत दोन लाखांचं उत्पन्न मिळालं आहे तर, आणखी दोन लाख उत्पन्न अपेक्षित उत्पन्न आहे." असं तरुण शेतकरी बालाजी उपवार यांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. शाळेतील मुख्याध्यापकाच्या कृत्यानं नांदेड हादरलं; गुंगीचं औषध देऊन केला अत्याचार, मग धमकी देत केला गर्भपात
  2. लाडक्या बहिणींमुळं घेतला हात आखडता? सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजन निधीत 'इतक्या' कोटींची कपात
  3. राजन साळवींचा ठाकरेंना 'जय महाराष्ट्र', आज करणार शिवसेनेत प्रवेश; भास्कर जाधव म्हणाले, "नाराजी दूर...."

Last Updated : Feb 13, 2025, 7:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.