उत्तराखंडमध्ये मुसळधार: अनेक भागात रस्ते गेले वाहून, ऋषिकेश-गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर भूस्खलन - ऋषिकेश-गंगोत्री राष्ट्रीय महामार्ग ठप्प
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12894726-thumbnail-3x2-heavy-rain-in-uttarakhand.jpg)
टिहरी (उत्तराखंड)- उत्तराखंडमध्ये होत असलेल्या जोरदार पावसामुळे टिहरी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग हा बंद करण्यात आला आहे. अचानक महामार्ग बंद झाल्यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात नागरिक फसले आहेत. ऋषिकेश-गंगोत्री राष्ट्रीय महामार्ग परिसरात झालेल्या पावसामुळे फकोट-आराखाल भागात रस्ता हा पाण्यासोबत वाहून गेला आहे. तर काही भागात भूस्खलनही झाले आहे. मुसळधार कोसळत असलेल्या पावासामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक ही ठप्प झाली आहे.