पहा थरारक VIDEO : 14 फूट किंग कोब्राने 9 फूट अजगराला गिळले! - किंग कोब्रा अजगर व्हायरल व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
बेलथनगडी ( बंगळुरू ) - किंग कोब्राचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. पण हा व्हिडिओ तुम्हाला चक्रावून टाकेल. 14 फूट लांब किंग कोब्राने ( 14-foot long King Cobra ) नऊ फूट लांब अजगराला गिळण्याचा ( King Cobra swallow python ) प्रयत्न केला. हा व्हिडिओ कर्नाटकातील दक्षिण कन्नडमधील आहे. बेलथनगडी तालुक्यातील आलदांगडी ( Aladangady cobra python video ) गावातील हे दृश्य आहे. किंग कोब्राने अजगराला संपूर्णपणे गिळण्याचा प्रयत्न केला. परंतु किंग कोब्रा गिळू शकला नाही. अजगराचा अर्धा भाग गिळल्यानंतर कोब्राने अजगराला हळूहळू बाहेर काढण्यास सुरुवात केली. वेणूर उपनगरमधील वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश गौडा ( forest Officer Suresh Gowda ) यांनी हे दृश्य पाहिले. त्यांनी ग्रामस्थांना ही माहिती दिली. इकडे अजगर गिळल्यामुळे कोब्रा सुस्त झाला होता. त्यानंतर सर्पमित्र घटनास्थळी आला. त्याने कोब्राला पकडून जंगल परिसरात सुखरूपणे सोडले.