GST : जीवनावश्यक वस्तूवर लावलेल्या जीएसटीच्या विरोधात प्रतिकात्मक पुतळा दहन करून निषेध - जीएसटीच्या विरोधात प्रतिकात्मक पुतळा दहन
🎬 Watch Now: Feature Video
देशात पहिल्यांदाच जीएसटी लागू झाल्यावर आम्ही त्याचं स्वागत केले होते. मात्र जीएसटी मध्ये जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करून पाच टक्के जीएसटी लागू केल्याने देशातील 130 करोड जनतेवर आर्थिक भार बसणार आहे. याच्याच विरोधात नाग विदर्भ चेंबर्स ऑफ असोसिएशनच्यावतीने विरोध करत जीएसटीचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. प्राथमिक स्तरावर पुतळा दहन करून विरोध करण्यात आला. मात्र सरकारने जीएसटी लावण्याचा निर्णय जर मागे घेतला नाही तर पुढील काळात तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. आज देशभरात व्यापारी संघटनांनी जीएसटीचा विरोध करत बंद पुकारला नागपुरात व्यापारी संघटनांनी बंद पाठिंबा देत दुकाने बंद ठेवलेत.