VIDEO : येवल्यात चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून चोरली सोन्याची पोत - 20 मार्च बातम्या
🎬 Watch Now: Feature Video
येवला ( नाशिक ):- भरदिवसा महिलेच्या गळ्यातील 2 तोळ्यांची सोन्याची पोत चोरट्यानी हिसकवल्याची घटना शनिवारी येवला शहरात घडली. चंडालिया हॉस्पिटलच्या बाजूला गणेशनगर भागात महिला कुरियर सामान घेऊन दुकानातून बाहेर रस्त्यावर आली होती. तेव्हा गाडीवर बसत असतानाच दुचाकीवरून येणार्या दोन चोरट्यांनी या महिलेच्या गळ्यातील पोत पठवली. आणि चोर पळून गेले. ही सर्व चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली असून या संदर्भात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST