VIDEO : युक्रेनमध्ये अडकलेले जळगावमधील सर्व विद्यार्थी सुखरूप परतले - युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी परतले
🎬 Watch Now: Feature Video
जळगाव - युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण व क्रीडा शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या जळगाव जिल्ह्यातील सर्व 19 विद्यार्थी घरी सुखरूप परतले असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने दिली आहे. युक्रेनमध्ये युध्द परिस्थितीमुळे भारतातील अनेक विद्यार्थी अडकले होते. केंद्र व राज्य शासन आणि प्रशासनाच्या प्रयत्नातून जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पोहचवले आहे. जिल्हा नियंत्रण कक्ष व मंत्रालय नियंत्रण कक्ष सातत्याने संपर्कात राहून विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले. विद्यार्थ्यांची प्रशासकीय अधिकार्यांकडून घरोघरी जाऊन चौकशी करण्यात येणार असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी देखील प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST