VIDEO : आई अंबाबाईची 'इंद्राणी मातृका' रुपात पूजा - etv bharat marathi
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13340390-1057-13340390-1634073373856.jpg)
कोल्हापूर - नवरात्रोत्सवाच्या आजच्या दिवशी करवीर निवासिनी आई अंबाबाईची इंद्राणी मातृका रुपात पूजा बांधण्यात आली. इंद्राणी मातृका देवांचा राजा इंद्र यांची शक्ती आहे. याला ऐंद्री, महेंद्री किंवा वज्री असे म्हणतात. ही चतुर्भुज असून हत्तीवर आरूढ झालेली आहे. तिच्या हातात वज्र, बोकड, पाश, कमळ आहेत. आजच्या या पूजेमध्ये देवी विविध दागिन्यांनी सजलेली असून तिची मुद्रा आक्रमक आहे. ही पूजा श्रीपूजक मयूर मुनिश्वर, सोहम मुनिश्वर आणि अरुण मुनिश्वर यांनी बांधली.