भाजप सरकार खुन्यांना का वाचवतय?, संजय राऊतांची लखीमपुर प्रकरणावर प्रतिक्रिया - Sanjay Raut's angry reaction in Lakhimpur case
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - लाखीमपूर खिरी या ठिकाणी शेतकऱ्यांना चिरडल्या प्रकरणी आज सर्वोच्य न्यायालयात सुनावणी होत आहे. जे यात मृत झाले त्यांना न्याय मिळेल. केंद्र सरकार कोणती माहिती लपवत आहे. आरोपींची नाव ओळख निष्पन्न झाली आहेत. तरी, त्यांना का अटक केली नाही? भाजप सरकार खुन्यांना का वाचवतय? असा संतप्त सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. 'महाराष्ट्र बंद' हा राजकीय बंद नाही तर मृत शेतकऱ्यांप्रति संवेदना व्यक्त करण्यासाठी बंद आहे. झेड'पी निवडणुक हे महाविकास आघाडीचे यश आहे. कोणाला किती जागा मिळाल्या हा ज्याच्या त्याचा गणित मांडण्याचा प्रश्न आहे अशी प्रतिक्रियाही राऊत यांनी स्थानिक निवडणुकांच्या निकालावर दिली आहे.