'बंगालमध्ये हिंसाचार भडकविणारे कोण आहे ते शोधले पाहिजे' - ममता बॅनर्जी
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालानंतर उसळलेल्या हिंसाचारावर दुःख व्यक्त केले आहे. पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या बातम्या फार दुःखद आहेत. पश्चिम बंगालचा निर्णय हा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक आहे. हा जनादेश मान्य करत दोन्ही बाजूने संयम राखणे गरजेचे आहे. दुर्दैवाने पश्चिम बंगालचा राजकीय इतिहास हा नेहमीच रक्तरंजित आणि हिंसाचाराने भरलेला आहे. देशाची स्थिती ही अत्यंत गंभीर आहे. सगळ्यांनी निवडणुकांमधील मतभेद, वाद मिटवून कोरोनाविरोधात लढण्याची गरज असतानासुद्धा हे का होत आहे याचा विचार दोन्ही बाजूंनी करायला हवा. एकमेकांना धमक्या, इशारे देणे थांबवायला पाहिजे असे राऊत यांनी म्हटले आहे. पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार घडविण्यात खतपाणी घालणारे हे पश्चिम बंगालमधले आहेत की बाहेरून कोणी याला खतपाणी घालत आहे हे देखील पाहायला हवं असं त्यांनी म्हटलं आहे. अदर पुनावालांनी धमक्यांबाबत काही वक्तव्य केलं असेल तर निश्चितच ते गंभीर आहे. महाराष्ट्रातून अशा प्रकारच्या धमक्या त्यांना कोणीही देणार नाही. महाराष्ट्राची ती परंपराच नाही किंबहुना महाराष्ट्राला या गोष्टीचा गर्व राहील की देशाची आरोग्यविषयक सुरक्षा निर्माण करणारे किंवा देशाला आरोग्यविषयक कवच-कुंडल देणारी जी लस आहे त्याची निर्मिती महाराष्ट्रात होते. ही एक राष्ट्रभक्तीची भावना महाराष्ट्रात कायम राहील त्यामुळे महाराष्ट्रातील कोणतेही नेते राजकीय पक्ष अशा प्रकारचे धमक्या देणार नाही असेही राऊत यांनी म्हटले आहे.