हातपंपाला हात न लावताही येतंय पाणी.. भूजल पातळी वाढल्याने हातपंपातून पाण्याचे फवारे - yevola news
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13247536-391-13247536-1633254950451.jpg)
येवला तालुक्यातील नगरसुल गावातील वडाचा मळा परिसरातील भामनाला नदी लगत असलेल्या हातपंपला हात न लावताही पाणी येत आहे. पाण्याचे फवारे या हातपंपातून उडत आहेत. नेहमीच हातपंपाला हाफसल्यानंतरच पाणी येत असते. मात्र या वडाचामळा परिसरात असलेल्या हातपंपाला हात न लावता देखील सतत पाणी चालू असल्याचे दृश्य बघण्यास मिळते. भूजल पातळी वाढल्याने पाणी येत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.