Viral Video : पिंपरीत उबर चालकाला रिक्षा चालकाची धक्काबुकी; मोबाईल फोडण्यास पाडले भाग - pimpari viral video
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - उबर वरील दुचाकी चालकाला रिक्षा चालकांनी धक्काबुकी (Uber driver pushes rickshaw driver) करत त्याच्याकडील मोबाईल फोडण्यास भाग पाडल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना पिंपरी-चिंचवडमधील पुनावळे येथे घडली आहे. अंकुश कृष्णा सूर्यवंशी वय-26 अस धक्काबुक्की झालेल्या उबर दुचाकी चालकाचे नाव आहे. त्याचबरोबर बाबुराव शामराव पांचाळ आणि शरणबसप्पा शामराव पांचाळ अशी धक्काबुकी करणाऱ्या रिक्षा चालकांची नावं आहेत. उबरमुळे रिक्षा चालकाचा व्यवसाय होत नसल्याने याच रागातून दुचाकी उबर चालकाला पकडून त्याला धक्काबुकी केली. तसेच त्याच्या उबरचा मोबाईल फोडण्यास सांगितला. मोबाईल फोडल्यानंतरच रिक्षा चालकांनी त्याला जाऊ दिलं, असं व्हिडिओ मध्ये दिसत आहे.