10 बाय 10 च्या खोलीत 'फिजिकल डिस्टन्स' ठेवणार कसा? थेट धारावीतून ग्राऊंड रिपोर्ट - Dharavi physical distance news
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - कोरोना विषाणू सर्व जगात धुमाकूळ घालत आहे. आर्थिक महासत्ता व वैद्यकीय सेवेत परिपूर्ण असणाऱ्या देशांनीसुद्धा कोरोनापुढे गुडघे टेकले आहेत. कोरोनापासून बचाव करायचा असेल तर नियमित साबणाने किंवा हॅन्डवॉशने हात स्वच्छ धुतले पाहिजेत. फिजिकल डिस्टन्सिंगचा अवलंब केला पाहिजे, अशा सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. मात्र, धारावीसारख्या झोपडपट्टीत 10 बाय 10 च्या खोलीत आणि सार्वजनिक शौचालयाचा वापर करणाऱ्या ठिकाणी फिजिकल डिस्टन्स ठेवायचा कसा? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. याबाबत ईटीव्ही भारतचा स्पेशल ग्राऊंड रिपोर्ट.