वाघाचा फोटो काढण्यासाठी जीवघेणी स्टंटबाजी; व्हिडिओ व्हायरल - चंद्रपुरात वाघाच्या फोटोसाठी स्टंटबाजी
🎬 Watch Now: Feature Video
चंद्रपूर - चंद्रपुरात वाघाचे फोटो (Tiger Photo) काढण्यासाठी एका हौशी फोटोग्राफरचा अतिउत्साहीपणा समोर आला. यात वाघ अवघ्या पाच फुटाच्या अंतरावर असताना हा अतिउत्साही फोटोग्राफर फोटो (Photographer catch Tiger Photo) काढत आहे. हा व्हिडिओ आता व्हायरल झाला असून, तो चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र परिसरातील असल्याची माहिती आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रात वाघाचे फोटो काढण्यासाठी सर्व नियम धाब्यावर बसवले जात आहेत. केवळ 5 फूट दुरून फोटोची हौस पूर्ण केली जात असल्याचे व्हायरल व्हिडिओतुन स्पष्ट झाले आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून बाहेर पडलेले वाघ आता जिल्ह्याच्या सर्वच क्षेत्रात संचार करत आहेत. जिल्ह्यात मुक्तसंचार करणाऱ्या या वाघांच्या उत्तम व्हिडिओ-फोटोसाठी वन्यजीवविषयक मुलभूत नियमांची पायमल्ली हौशी फोटो-व्हिडिओग्राफर्स करत आहेत. वाघांच्या या पॅपेराझिना शोधून वनविभागाने त्यांना आवर घालण्याची गरज व्यक्त होत आहे.