'वाचन प्रेरणा दिनी' उदय सामंतांनी केली एशियाटिक लायब्ररी खुली - डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंती न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - देशाचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची आज ८९वी जयंती आहे. त्यांच्या जन्मदिन 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून राज्य शासनाने राज्यातील ग्रंथालये आणि वाचनालये खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या सात महिन्यापासून कोरोनामुळे सर्व ग्रंथालये आणि वाचनालये बंद होती. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एशियाटिक लायब्ररी खुली केली. याचा आढावा घेतला आहे ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी....