VIDEO : नागझरी नदीला आलेल्या पुरात दोन युवक गेले वाहून, पोहता येत असल्याने वाचला जीव - youth washed in Nagzari river flood
🎬 Watch Now: Feature Video
औरंगाबाद - गंगापूर तालुक्यातील धामोरी बुद्रुक येथील नागझरी नदीला आलेल्या पुरात दोन युवक वाहून गेल्याची घटना घडली आहे. हे युवक शेतातून घरी जात होते. त्यावेळी नागझरी नदीवरील पाण्याचा प्रवाह वाढल्याने ते दोघे यात वाहून गेले. पोहता येत असल्याने पुलापासून चारशे ते पाचशे फूट अंतरावर असलेल्या झाडावर युवक सुखरूप असल्याची माहिती समोर येत आहे. सोपान शेळके धामोरीकर आणि ज्ञानेश्वर शेळके धामोरीकर असे त्या युवकांचे नावे आहेत.