कंधारमध्ये भीषण अपघात; उपचारा दरम्यान दोघांचा मृत्यू - नांदेड अपघात
🎬 Watch Now: Feature Video
नांदेड - ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाल्याची घटना कंधार येथे घडली आहे. या अपघात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज (सोमवारी) सायंकाळच्या सुमारास घडली आहे. मालवाहतूक करणाऱ्या गाडीचा अचानक ब्रेक फेल झाला होता. अपघात इतका भीषण होता की रस्त्याच्या बाजूची दुकानं आणि वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला आहे. या अपघातात कंधार तालुक्यातील बाभूळगाव येथील दाम्पत्याचा उपचारा दरम्यान मृत झाला आहे. एकूण 16 जण गंभीर जखमी असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखवण्यात आले आहे. अपघाताची तीव्रता लक्षात घेता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.