यवतमाळ : अरुणावती धरणाचे तीन दरवाजे उघडले; प्रती सेकंद 18 क्युसेक पाण्याचा विसर्ग - arunavati dam yawatmal news
🎬 Watch Now: Feature Video
यवतमाळ - दिग्रसपासून नऊ किलोमीटर अंतरावरील अरुणावती धरणात पाणी वाढल्याने धरणाचे तीन दरवाजे उघडून प्रतिसेकंद 18 क्युमेक्स प्रमाणे पाणी सोडण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून अरुणावती धरण परिसरात संततधार पाऊस सुरू असल्याने धरणाची पातळी ऑगस्ट मधील 85 टक्क्याच्या वर गेल्याने रात्रीपासून धरणाचे 11 दरवाजांपैकी 1, 6 व 11 क्रमांकाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहे. नियमाप्रमाणे ३१ ऑगस्टपर्यंत ८५ टक्के धरणात जलसाठा अपेक्षित आहे. त्यामुळे पुढील 12 तासात हे तीन दरवाजे कोणत्याही क्षणात बंद करण्यात येतील. तर सप्टेंबर महिन्यात धरण 100 टक्के होईपर्यंत पाण्याचा विसर्ग करायचा की नाही हे पावसाच्या परिस्थितीवर अवलंबून असल्याची माहिती अरुणावती प्रकल्प विभागाने दिली आहे.