VIDEO : जव्हार येथील जुन्या पोलीस लाईन चाळीला आग; साहित्याचे नुकसान - Fire brigade
🎬 Watch Now: Feature Video
पालघर - जव्हारमध्ये मुख्य बाजारपेठेत असलेली जुन्या पोलीस लाईन चाळीला भीषण आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नसून अग्निशामन दल व स्थानिकांच्या अथक प्रयत्नांनी आग नियंत्रणात आणण्यात आली. प्रथम शोभा आळे या महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या घराला ही आग लागली होती. घरात जुनी व लाकडी चाळ असल्याने आगीचा भडका वाढत गेला. आगीने रौद्ररूप धारण केले होते. या आगीत शेजारील काही घरांनाही झळ बसली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दल व स्थानिकांच्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. घटनेच्यावेळी सुदैवाने घरात कोणीही नसल्याने जीवितहानी झालेली नाही. मात्र घराचे व साहित्यांचे मोठे नुकसान झाले आहे.