thumbnail

Makar Sankrant Special : हलव्याच्या दागिन्यांनी सजली पुण्याची बाजारपेठ!

By

Published : Jan 11, 2022, 7:59 AM IST

पुणे - मकरसंक्रांतीचा सण म्हटले की तिळगुळ सोबतच हलव्याच्या दागिन्यांची देखील प्रथा आहे. नवजात शिशु असो नवीन सुष्णा असो किंवा जावई असो, यांना हलव्याचे दागिने घालून सजवणे हा मोठ्या कौतुकाचा विषय असतो. मकर संक्रांतीनिमित्त पुण्याच्या बाजारपेठांमध्ये नवनवीन हलव्याचे दागिने आलेले आहेत. या दागिन्यांची खासियत अशी की; अतिशय बारीक आणि नाजूक कलाकुसरीने हे दागिने बनवले आहेत. महालक्ष्मी हार, तनमनी हार, पायातली पैंजण, बाजूबंद एवढेच काय तर मोबाईलचे कवर देखील आपल्याला या हलव्याचे दागिने पासून बनलेला दिसेल. लहान बालकांना बोरन्हासाठी आणि मकर संक्रांती निमित्ताने सुंदर सुंदर हलव्याचे दागिने आपल्याला पहायला मिळतील. याबाबत ईटीव्ही भारतने पुण्यातील हलव्याच्या दागिन्यांची विक्रेते सोनिया पाटणकर आणि प्रणव गंजीवाले यांच्याशी बातचीत केली आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.