ETV Bharat / state

आनंदवनात भेट अन् मेळघाटात लव्ह स्टोरी सेट; ढिशुम-ढाशुम, रडणं, हसणं सारं काही...पाहा व्हिडिओ - DHANANJAY AND GEETA LOVE STORY

प्रेमासाठी अनेकजण वाट्टेल ते करतात. प्रेमाचे भन्नाट किस्से आपण नेहमीच ऐकतो. व्हिलेंटाईन्स डेच्या पूर्व संध्येला मेळघाटातील धनंजय आणि गीता यांची प्रेम कहाणी जाणून घेऊयात.

Dhananjay and Geeta
धनंजय आणि गीता (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 13, 2025, 8:58 PM IST

अमरावती : तो वर्धा जिल्ह्यातल्या आष्टी शहीद गावातला आणि ती मेळघाटच्या दुर्गम भागात वसलेल्या सादराबाडी गावातली रहिवासी. चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवनात योगायोगान दोघांची भेट झाली. एकमेकांचा मोबाईल नंबर घेतला. पुढे थेट दोन वर्षांनी मेळघाटात ते एकमेकांच्या समोर आले. पूर्वी ज्या युवतीनं नकार दिला तिच्यासाठीच लिहिलेलं पत्र त्यानं आता हिला दिलं. यावेळी त्याला होकार मिळाला आणि आनंदवनात झालेल्या भेटीनंतर मेळघाटात लव्ह स्टोरी सेट झाली. चित्रपटातल्या सारखंच या प्रेम कहाणीत देखील थोडीशी ढिशुम-ढाशुम, रडणं, हसणं सारं काही झालं. मेळघाटच्या जंगलात राहणाऱ्या आदिवासी मुलांना उच्च शिक्षण मिळावं यासह आदिवासी बांधवांना नैसर्गिक साधनांच्या व्यवस्थापनातून रोजगार मिळावा याकरता काम करणाऱ्या, प्रेमीयुगुलाची दांपत्य म्हणून जगण्याची आनंदमयी सुरुवात झाली. व्हॅलेंटाईन डे च्या (Valentines Day 2025) निमित्तानं धनंजय आणि गीता यांची प्रेम कहाणी आणि त्यांचं मेळघाटवर असणारं प्रेम यासंदर्भात "ईटीव्ही भारत"चा हा स्पेशल रिपोर्ट.

अशी झाली पहिली भेट : वर्धा जिल्ह्यातल्या आष्टी शहीद या गावातील रहिवासी असणारा धनंजय सायरे यानं पदवीधर स्वयंसेवक फेलोशिप अंतर्गत 2011 मध्ये लुप्त होण्याच्या मार्गावर असणाऱ्या माळढोक या पक्षाचा अभ्यास केला. दरम्यान पुण्यात पर्यावरण शिक्षण केंद्र या ठिकाणी पर्यावरण समन्वयक म्हणून धनंजय काम करत असताना 2015 मध्ये आनंदवनचे संचालक प्रकाश आमटे यांनी कोळसा खाणीपासून माळढोक संवर्धन कसं करता येईल यासाठी चर्चा करण्याच्या निमित्तानं धनंजय सायरे याला आनंदवनात बोलवलं. ज्या दिवशी धनंजय आनंदवनात पोहोचला त्याच दिवशी समाज प्रगती सहयोग या संस्थेच्या वतीनं आनंदवनात एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या निमित्तानं मेळघाटातील सादराबाडी या अतिदुर्गम गावातील युवती गीता देखील सहभागी झाली. आनंदवनात पहिल्यांदाच धनंजय आणि गीता यांची भेट झाली.

प्रतिक्रिया देताना धनंजय आणि गीता सायरे (ETV Bharat Reporter)

दोन वर्षानंतर भेटीचा पुन्हा योग : आनंदवनात झालेल्या भेटीच्या वेळी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले. अधून मधून बोलणं व्हायचं. धनंजय पाणी फाउंडेशनमध्ये रुजू झाला आणि त्याला कार्यक्षेत्र मेळघाटात मिळालं. मेळघाटात हरिसाल ते धारणी मार्गावर थोडं आतमध्ये असणाऱ्या कोठा गावातील मुठवा निसर्ग संशोधन केंद्र या ठिकाणी धनंजय पाणी फाउंडेशन अंतर्गत एक कार्यशाळा घेण्याकरता आला. यावेळी या कार्यशाळेत गीता सहभागी झाली. दोन वर्षांपूर्वी झालेल्या भेटीची आठवण यानिमित्ताने ताजी झाली.

होय लग्न झालं, दोन मुलंही आहेत : "कोठा या गावात पाणी फाउंडेशनच्या कार्यशाळेत पुन्हा एकदा भेट झाल्यावर धनंजयनं मला तुझं लग्न झालं का? असा प्रश्न विचारला. त्यावेळी हो माझं लग्न झालं आणि मला दोन मुलं आहेत असं मी त्याला सांगितलं. माझं हे वाक्य ऐकल्यावर त्याचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झाला होता. तो मला हळूच म्हणाला तुझा नवरा कुठं आहे. त्यावेळी मी आणि माझी मैत्रीण खळखळून हसलो. माझं अद्याप लग्न झालं नाही हे त्याला त्यावेळी कळलं", अशी आठवण गीताने सांगितली.

पहिलीनं नकारलेल्या पत्राचा दुसरीनं केला स्वीकार : धनंजय आणि गीता यांच्या प्रेम कहाणीत पहिल्यांदा प्रपोज धनंजयनं केलं. विशेष म्हणजे धनंजयनं एक पत्र गीताला दिलं. या पत्राचं वैशिष्ट्य म्हणजे धनंजयनं दोन वर्षांपूर्वी पुण्यात असताना एका झेरॉक्सचा दुकानात काम करणाऱ्या युवतीचं दिवसभराचं कष्ट पाहून तिला प्रपोज करण्यासाठी विशेष असं पत्र लिहिलं. ते पत्र युवतीनं वाचलं आणि पत्रात धनंजयनं व्यक्त केलेल्या विचारांना नाकारलं. अतिशय मेहनतीनं लिहिलेलं हे पत्र मी माझ्या ईमेलवर जपून ठेवलं. दोन वर्षांनी तेच पत्र मी गीताला दिलं आणि गीतानं मला होकार दिला असं धनंजय "ईटीव्ही भारत"शी बोलताना म्हणाला.

पत्रात होतं जंगलात राहू : खरंतर पुण्यात आवडलेल्या झेरॉक्सच्या दुकानात काम करणाऱ्या मुलीला आपण जंगलात राहू. निसर्गात भटकू आणि जंगलातच काम करू अशा आशयाचं पत्र धनंजयनं‌ लिहिलं होतं. पुण्यातल्या मुलीला धनंजयचं जंगल वगैरे काही आवडलं नाही. पुढं हेच पत्र मेळघाटातील रहिवासी असणाऱ्या गीताच्या हाती पडलं आणि गीता धनंजयच्या प्रेमात अगदी भारावून गेली.

लग्नाचा प्रस्ताव घेऊन तो पोहोचला तिच्या घरी : पाणी फाउंडेशनच्या कार्यशाळेपासून खऱ्या अर्थानं प्रेम प्रकरणाला सुरुवात झाली. धनंजय थेट सादराबादी येथे गीताच्या घरी लग्नाचा प्रस्ताव घेऊन पोहोचला. गीता गवलान समाजाची आणि धनंजय गोवारी समाजाचा. धनंजयनं गीताला घातलेली लग्नाची मागणी ऐकून गीताच्या आई-वडिलांना धक्काच बसला. "आम्ही तुला यासाठीच शिकवलं का? असं म्हणत आईनं मला त्यावेळी चांगलंच मारलं" असं गीता म्हणाली.

असं झालं लग्न : लग्नाला गीताच्या घरच्यांचा विरोध होता. असं असलं तरी धनंजयच्या घरी मात्र लग्नाला परवानगी मिळाली. धनंजयचे वडील आष्टी शहीद या गावात एका शाळेत लिपिक म्हणून काम करत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार त्यांच्या कुटुंबात होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी संत गाडगे महाराज आणि भाकरे महाराज यांचं मंदिर धनंजयच्या घराजवळ आहे. गत तीस वर्षांपासून 1 जानेवारी ते 7 जानेवारी पर्यंत भागवत सप्ताह या मंदिरात असतो. या भागवत सप्ताहाच्या पर्वावरचं धनंजय आणि गीता यांचं लग्न 7 जानेवारी 2018 रोजी लावून देण्यात आलं. या लग्नात गीताच्या घरचं कोणीही नव्हतं. मात्र गावातल्या माझ्या मैत्रिणी, शेजारची मंडळी हे सारे आले होते असं गीता सांगते.

आज सासरच्या मंडळींनाही जावई प्रिय : गीतानं प्रेम विवाह करणं हे तिच्या कुटुंबीयांना मान्य नव्हतं. 2019 मध्ये धनंजय आजारी पडला. गीतानं रडतच आपल्या आईला फोन केला. गीताच्या मदतीकरता आई धावून आली. धनंजयच्या प्रकृतीत सुधारणा झाली. यानंतर गीताच्या आई-वडिलांचा रोष विरला आणि मुलीसोबतच त्यांना जावई देखील प्रिय झाला. आज माझे भाऊ, काका आणि घरातील सर्वच आमच्या सोबत आहेत. आम्ही दोघांनी मिळून माझ्या बहिणीच्या मुलीला दत्तक घेतलं. फुले दांपत्यानं जसं यशवंताला दत्तक घेऊन डॉक्टर बनवलं अगदी तसंच आम्ही आमच्या मुलीला मोठं करतोय असं धनंजय सांगतो.

मेळघाटात सुरू आहे सामाजिक कार्य : मेळघाटातील आदिवासी मुलांना शिक्षण मिळावं ते देखील उच्चशिक्षित व्हावेत या उद्देशानं उच्च शिक्षण मिशन अंतर्गत धनंजय आणि गीता हे दांपत्य काम करत आहेत. यासोबतच आदिवासींचं जीवन हे शेती, जंगल, पशुपालन, पाणी, माती ह्या नैसर्गिक साधनांवर अवलंबून आहे. यामुळं या नैसर्गिक साधनांचं व्यवस्थापन करून त्याचं संवर्धन आणि त्यावर आधारित रोजगार मेळघाटातील आदिवासींना मिळावा यासाठी देखील या दांपत्याची धडपड सुरू आहे. या दांपत्याच्या कामाची दखल घेत महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळातर्फे जैवविविधता संवर्धन पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं. रोटरी क्लब पुणे तर्फे ग्रीन ॲम्बिसेडर अवार्ड दिला आणि पर्यावरण दूत म्हणून त्यांना पुरस्कृत करण्यात आलं. युनिसेफ आणि पर्यावरण शिक्षण केंद्र पुणे यांच्या वतीनं महाराष्ट्र युथ फॉर क्लायमेट ॲक्शन परिषद अंतर्गत धनंजयचा संसाधन व्यक्ती म्हणून सन्मान करण्यात आला.

त्याच्या शिक्षणाकरता तिची तळमळ : धनंजयला गतवर्षी पुण्यातील प्रतिष्ठित अशा एस. पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सेंटर येथे डेव्हलपमेंट मॅनेजमेंट या पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रामसाठी निवडण्यात आलं. हा अभ्यासक्रम धनंजय ऑनलाईन करतो आहे. माखला या गावात पाणी आणि विजेची समस्या असल्यामुळं सध्या धनंजयला शिक्षणात अडचण येऊ नये याकरता, गीता ही कोठा येथील निसर्ग संसाधन केंद्रात व्यवस्थापक म्हणून नोकरी करते. निसर्ग संरक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. निशिकांत काळे यांनी या ठिकाणी मला अभ्यास करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली. माझं शिक्षण पूर्ण करण्याकरता गीताचा खूप मोठा हातभार आहे. तिच्याशिवाय माझं शिक्षण शक्यच नव्हतं, असं धनंजय म्हणतो. व्हॅलेंटाईनच्या निमित्तानं निसर्गाच्या सहवासात राहून निसर्गासाठी वाहून घेणाऱ्या या जोडप्याची लव्ह स्टोरी तुम्हाला नक्कीच आवडली असेल.

हेही वाचा -

  1. व्हॅलेंटाईन्स डे 2025; Rose Day पासून सुरू होतो प्रेमाचा आठवडा; जाणून घ्या दिवसेंदिवस कसे फुलते प्रेम
  2. ‘व्हॅलेंटाईन्स डे’ला 54 जोडपी लग्नाच्या बेडीत; दोघींनी पटवला फॉरेनचा नवरा
  3. सिंगल आहात? डोंट वरी... असा साजरा करा 'व्हॅलेंटाईन्स डे'; जाणून घ्या टिप्स

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.