आता कर्कश हॉर्न ऐकू येणार नाहीत, भारतीत वाद्यांचा आवाज ऐकू येणार; गडकरी यांची माहिती - musical horn
🎬 Watch Now: Feature Video
वाहनांच्या जोरात हॉर्न वाजवण्यावर पूर्ण बंदी असेल. तसेच, वाहनांना हार्मोनियम, तबला इत्यादी भारतीय वाद्यांचा आवाज हॉर्न म्हणून वापरणे बंधनकारक असेल. यासाठी लवकरच आम्ही एक कायदा आणण्याचा विचार करत आहोत. अशी माहिती केंद्रीय नितीन गडकरी यांनी दिली आहे. ते नाशिकमध्ये उड्डाणपुलाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.
ज्या कामाचे भूमिपूजन केले त्याचे लोकार्पण करतोय याचा आनंद झाला. तीन टक्के जीडीपी अपघातामुळे कमी होतो. मुंबई-पुणे हायवे वरील पन्नास टक्के अपघात कमी झाले आहेत. पहिले पुणे आवडायचे, आता नाशिक आवडते कारण येथे आता वातावरण सुंदर झाले आहे. नाशिकरोड ते द्वारका हा मेट्रो रूटवर डबलडेकर 2 लेन फ्लाय ओव्हर मंजूर करण्यात आला आहे. त्यासाठी 1600 कोटी मंजूर केले आहेत. 2 वर्षात याच्या उदघाटनासाठी मी येणार असल्याची घोषणाही गडकरींनी केली. ठाणे-मुंबई रस्ता फारच खराब आहे. याचे तातडीने इंस्पेक्शन करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले आहेत. लवकर हा रस्ता सिमेंट कॉंक्रिटचा होणार आहे. तसेच, समृद्धी महामार्गाला जोडला जाणारा रस्ता तयार करण्यात येणार आसून, त्यासाठी 5 हजार कोटींच्या रस्त्याला मंजुरी देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.