शहरांमध्ये प्राचीन, अतिप्राचीन वृक्षांचे संरक्षण करणारी हेरिटेज ट्री ही संकल्पना राबवणार - मुंबई जिल्हा बातमी
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - राज्याच्या नागरी भागांत 50 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या वृक्षांना हेरिटेज ट्री, असे संबोधून त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. यासाठी महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियमामध्ये सुधारणा करण्यात येईल.