चिखलदऱ्यात शेकडो कावळ्यांचा संशयास्पद मृत्यू - शंभर पेक्षा जास्त कावळ्यांचा मृ्त्यू
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती - जिल्ह्यातील चिखलदरा येथे शंभर पेक्षा जास्त कावळे एकाएकी संशयास्पदरित्या मृत्यूमुखी पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. चिखलदरा नगरपालिकाचे उपाध्यक्ष शेख अब्दुल व सामाजिक कार्यकर्ते इब्बू शहा यांनी मृत्यू पडलेले कावळे चिखलदरा पशुवैद्यकीय रुग्णालयात नेले असता रुग्णालयच बंद असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. मात्र अचानक झाडावरून कावळे खाली पडून मृत्यू होत असल्याने खळबळ उडाली आहे. तर विषबाधा की आणखी कशाने कावळ्यांचा मृत्यू होत आहे, याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र पशुवैद्यकीय निवासी अधिकारी नसल्याने कार्यालय बंद असते. त्यामुळे त्यांनी नियमीतपणे उपस्थित राहावे, अशी मागणी करण्यात येत आहे.