श्रद्धानंद अनाथालयातील विद्यार्थिनी बनवतायत 'रेडीमेड गुढी'.. - नागपूर रेडिमेड गुढी
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - मांगल्याचे प्रतीक म्हणून गुढीपाडव्याला राज्यातील प्रत्येक मराठी घरात गुढी उभारली जाते. चैत्र महिन्याची सुरुवात ज्या दिवसाने होते, तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. मराठी नवीन वर्ष म्हणून देखील गुढीपाडव हा सण साजरा केला जातो. बदलत्या काळानुसार आता पारंपरिक गुढी देखील नव्या रूपात आणि स्वरुपात उपलब्ध होऊ लागल्या आहेत. लोकांकडे वेळ नसल्याने आता तयार असलेल्या गुढींची मागणी वाढली आहे. या संधीचे सोने करण्याच्या उद्देशाने नागपुरातील श्रद्धानंदपेठ येथील श्रद्धानंद अनाथालयातील सुमारे २० विद्यार्थिनींनी 'पोर्टेबल गुढी' तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या विद्यार्थिनींचे हात सध्या अतिशय सुबक आणि आकर्षक गुढ्या तयार करण्यात मग्न झाले आहेत. दिवसातील काही तास या विद्यार्थ्यांनी गुढी तयार करतात, ज्यातून मिळालेले उत्पन्न श्रद्धानंद अनाथलय प्रशासन या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करतात. त्यामुळे भविष्यात या विद्यार्थ्यांकडे स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा निधीची कमतरता भासू नये, हा या मागचा उद्देश आहे.