जिल्हात लॉकडाऊनच्या कडक अंमलबजावणीला सुरुवात; 9 जूनपर्यंत असणार कडक लॉकडाऊन - रत्नागिरीत 9 जूनपर्यंत असणार कडक लॉकडाऊन
🎬 Watch Now: Feature Video
रत्नागिरी - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. कोरोनाची ही साखळी खंडित करण्यासाठी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आले आहे. 9 जूनपर्यंत हा कडक लॉकडाऊन असणार आहे, या लॉकडाऊनची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळत आहे. या लॉकडाऊनमध्ये मेडिकल सुरू असणार आहेत. तर कृषी दुकाने, तसेच बँका आणि वित्तीय संस्था दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू असतील. इतर किराणा दुकाने, चिकन, मटण, मच्छि दुकाने पुर्णतः बंद असणार आहेत. तर दुधाची फक्त घरपोच सेवा देता येणार आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
Last Updated : Jun 3, 2021, 12:40 PM IST