ETV Bharat / bharat

कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे मार्गदर्शी चिट फंडच्या १२२ व्या शाखेचं उद्घाटन - MARGADARSHI CHIT FUND

मार्गदर्शी चिट फंड सतत आपल्या शाखांचा विस्तार करत आहे. आज कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे १२२ व्या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं.

Margadarshi Chit Fund Branch
मार्गदर्शी चिट फंडच्या १२२ व्या शाखेचं उद्घाटन (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 17, 2025, 10:18 PM IST

बेंगळुरू : मार्गदर्शी चिट फंड भारतातील सर्वात विश्वासार्ह चिट फंड कंपन्यांपैकी एक आहे. मार्गदर्शी आपल्या शाखांचा सतत विस्तार करत आहे. कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे सोमवारी मार्गदर्शी चिटफंडच्या नवीन शाखेचं उद्घाटन करण्यात आलं. मार्गदर्शी चिट फंडच्या व्यवस्थापकीय संचालक शैलजा किरण यांनी १२२ व्या शाखेचं आज उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी उद्घाटन समारंभात उपस्थित असलेल्या सर्व लोकांना शुभेच्छा दिल्या.

चार राज्यांमध्ये शाखा कार्यरत : उद्घाटनानंतर माध्यमांशी बोलताना एमडी शैलजा किरण म्हणाल्या, "मार्गदर्शी चिट फंडची स्थापना १९६२ मध्ये संस्थापक अध्यक्ष रामोजी राव यांनी केली होती. आज आम्ही चार राज्यांमध्ये कार्यरत आहोत. मार्गदर्शी चिट फंड सध्या आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये कार्यरत आहे आणि त्यांच्या १२१ शाखा यशस्वीरित्या सुरू आहेत. चित्रदुर्गात उघडलेली ही नवीन शाखा कंपनीची कर्नाटकातील २६ वी शाखा आहे आणि चार राज्यांमध्ये एकत्रित १२२ वी शाखा आहे". तर नवीन शाखेच्या उद्घाटनादरम्यान, कर्नाटकातील मार्गदर्शी चिट फंडचे संचालक लक्ष्मण राव, मार्गदर्शी चिट फंडचे उपाध्यक्ष बलराम कृष्णा, महाव्यवस्थापक नानजुंड्य ए चंद्रैया, वरिष्ठ अधिकारी विश्वनाथ राव, कर्नाटकातील मार्गदर्शीच्या विविध शाखांचे व्यवस्थापक विजयकुमार, चित्रदुर्ग शाखा व्यवस्थापक प्रवीण बी ए आणि ग्राहक उपस्थित होते.

प्रतिक्रिया देताना शैलजा किरण (ETV Bharat Reporter)

१०,००० कोटी रुपयांची उलाढाल : या वर्षभरात राज्यात आणखी पाच ते सहा शाखा उघडण्याच्या योजनाही त्यांनी सांगितल्या. कंपनीच्या आर्थिक कामगिरीबद्दल चर्चा करताना एमडी शैलजा किरण म्हणाल्या की, मार्गदर्शी चिट फंडनं चालू आर्थिक वर्षात १०,००० कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. तर कंपनीने पुढील आर्थिक वर्षासाठी १३,००० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवलं आहे. ही कंपनी २.५ लाख ग्राहकांना सेवा देते आणि २.५ लाख रुपयांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतच्या चिट-फंड योजना देते.

लोकांसाठी एक विश्वासार्ह : "मार्गदर्शी चिट फंड शेतकरी, शिक्षक, डॉक्टर, अभियंते, व्यापारी, उद्योगपती आणि आयटी आणि इतर उद्योगांमधील व्यावसायिकांसह विविध क्षेत्रातील लोकांसाठी एक विश्वासार्ह आर्थिक भागीदार बनला आहे." असं एमडी शैलजा किरण यांनी नमूद केलं.

ग्राहकांनी व्यक्त केला आनंद : चित्रदुर्गात मार्गदर्शी चिट फंड शाखेच्या उद्घाटनानिमित्त ग्राहकांनी आनंद व्यक्त केला. यावेळी अनेक ग्राहकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि सांगितलं की, मार्गदर्शी चिट फंडमुळं त्यांना खूप फायदा झाला आणि मार्गदर्शी त्यांच्या सर्व आर्थिक गरजांसाठी त्यांचं मार्गदर्शक बनले आहे.

पैसे वेळेवर मिळतात : कंपनीचे ग्राहक प्रशांत म्हणाले, "मार्गदर्शक चिट फंड गेल्या १८ वर्षांपासून मला मदत करत आहे. एक शेतकरी म्हणून, ते माझ्यासाठी खूप उपयुक्त ठरले आहे. मला माझे पैसे वेळेवर मिळतात. माझा कंपनीवर खूप विश्वास आहे. त्यामुळं माझ्या मुलांच्या शिक्षणातही मदत झाली. कंपनीचे कर्मचारी देखील आमच्याशी चांगले वागतात."

ग्राहकांनी दिली प्रतिक्रिया : आणखी एक ग्राहक सय्यद अहमद म्हणाले, "माझ्या एका मित्राने मला या मार्गदर्शी चिट फंडाबद्दल सांगितलं. मी गेल्या १५ वर्षांपासून सतत त्याचा ग्राहक आहे. आमच्यासाठी मार्गदर्शी म्हणजे १०० टक्के विश्वास. मी एका आयटीआय कॉलेजचा प्राचार्य आहे. त्यांनी माझ्या कॉलेजच्या विकासासाठी निधी उभारला आहे. माझ्या मुलांच्या शिक्षणातही मदत केली. आता आम्हाला खूप आनंद आहे की, आमच्या जिल्ह्यात चित्रदुर्ग येथे एक शाखा सुरू झाली आहे."

हेही वाचा -

  1. कर्नाटकात मार्गदर्शी चिट फंडचा विस्तार: केंगेरीमध्ये 119 व्या शाखेचं उद्घाटन
  2. मार्गदर्शी चिटफंडची कर्नाटकात केंगेरीमध्ये ११९वी नवीन शाखा, बुधवारी उद्घाटन
  3. रामोजी राव यांच्या 88व्या जयंतीनिमित्त 'मार्गदर्शी'च्या आणखी तीन शाखांचं उद्घाटन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.