ETV Bharat / sports

BAN vs IND 2nd Match Live: पहिल्याच सामन्यात भारताचा शेजाऱ्यांविरुद्ध दणदणीत विजय - CHAMPIONS TROPHY 2025

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या दुसऱ्या सामन्यात आज भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघ आमनेसामने आहेत. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे.

BAN vs IND 2nd Match Live
BAN vs IND 2nd Match Live (AP Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Feb 20, 2025, 2:54 PM IST

Updated : Feb 20, 2025, 9:52 PM IST

दुबई BAN vs IND 2nd Match Live : चॅम्पियन्स ट्रॉफीचा दुससा सामना आज भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघात खेळवण्यात आला. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारतानं 6 विकेटनं विजय मिळवत स्पर्धेची विजयी सुरुवात केली आहे. बांगलादेशनं दिलेलं 229 धावांचं लक्ष्य भारतानं 47व्या षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यात गाठलं.

भारताची आक्रमक सुरुवात : या सामन्यात बांगलादेशी संघानं भारताला विजयासाठी 229 धावांचं लक्ष्य दिले आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघानं कोणतीही विकेट न गमावता सुमारे 40 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा आणि शुभमन गिल क्रीजवर आहेत. दरम्यान रोहित शर्मानं वनडे क्रिकेटमध्ये 11 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. मात्र यानंतर 10व्या षटकात आक्रमक फटका मारण्याच्या नादात रोहित झेलबाद झाला. त्यानं 36 चेंडूत आक्रमक 41 धावा केल्या. यानंतर विराट कोहली देखील 22 धावांवर आउट झाला. यानंतर श्रेयस अय्यर, अक्षर पटेल स्वस्तात बाद झाले. यानंतर शुभमन गिल आणि केएल राहुलनं नाबाद भागीदारी करत भारताला विजय मिळवून दिला.

बांगलादेशची खराब सुरुवात : या सामन्यात बांगलादेश संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. बांगलादेशची धावसंख्या 5 विकेटच्या मोबदल्यात सुमारे 36 धावा आहे. सामन्यात बांगलादेशची सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्याच षटकात मोहम्मद शमीनं सौम्य सरकारला (0) यष्टीरक्षक केएल राहुलकडून झेलबाद केलं. त्यानंतर पुढच्याच षटकात हर्षित राणानं कर्णधार नजमुल हुसेन शांतो (0) ला विराट कोहलीनं झेलबाद केले. शांतो बाद झाला तेव्हा धावसंख्या 2 बाद 2 धावा होती. मात्र त्यानंतर तन्जीद हसन आणि मेहदी हसन मिराज यांनी काही आक्रमक फटके मारुन डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र डावाच्या नवव्या षटकात अक्षर पटेलनं देन विकेट घेत बांगलादेशला बॅकफुटवर ढकललं. मात्र यानंतर जाकेर अली आणि तौहीद हृदयॉय यांनी दीडशतकी भागीदारी करत बांगलादेशचा डाव सावरला. मात्र अखेर 43व्या षटकात मोहम्मद शमीनं जाकेर अलीला बाद करत ही भागीदारी तोडली. यानंतर तौहीद हृदयॉयनं आपलं पहिलं शतक झळकावत बांगलादेशला 228 या सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवलं.

दोन्ही संघांची प्लेइंग 11 :

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव.

बांगलादेश : तन्जीद हसन, सौम्या सरकार, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तौहीद हृदयॉय, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराज, झाकेर अली, रिशाद हुसेन, तन्झीम हसन साकिब, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान.

हेही वाचा :

  1. 12 वर्षांनंतर 'मिनी वर्ल्ड कप' जिंकण्यासाठी टीम इंडिया शेजाऱ्यांविरुद्ध उतरणार मैदानात; BAN vs IND मॅच 'इंथ' पाहा लाईव्ह
  2. भारताचा 'प्रिन्स' अव्वल स्थानावर; कीवींविरुद्ध मॅच सुरु असताना पाकिस्तानच्या बाबरला धक्का

Last Updated : Feb 20, 2025, 9:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.