ST Workers Strike : संवेदनशील मुख्यमंत्रीच एसटी संपावर काढू शकते तोडगा; राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा विश्वास - एसटी कामगार संप सुरुच
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - एसटी महामंडळ विलीनीकरणाच्या मागणीवरुन तब्बल दोन महिन्यापासून सुरु असलेल्या संपामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. महामंडळाने कामगारांना अंतरिम वेतनवाढ, निलंबन आणि बडतर्फीची कारवाई करू सुद्धा कर्मचारी आंदोलन मागे घेत नाही आहे. या संपावर तोडगा निघावा, यासाठी शरद पवार यांनी देखील प्रयत्न केले. एसटी कर्मचाऱ्यांच्या २२ संघटनांसोबत (दहा जानेवारीला) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी चर्चा केली. या संपावर तोडगा निघू शकते, असा विश्वास राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलतांना व्यक्त केला आहे.
TAGGED:
ST Workers Strike