साताऱ्याजवळ एसटी बसला भीषण आग; कोणतीही जीवित हानी नाही - एसटी बसला अचानक भीषण आग
🎬 Watch Now: Feature Video
सातारा - पुणे - बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्याजवळ उडतारे गावच्या हद्दीत एसटी बसला अचानक भीषण आग लागली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. आनेवाडी टोल नाक्या नजीक रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पुण्याकडून कोल्हापूरकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसने अचानक पेट घेतला. हा प्रकार चालकाच्या लक्षात येताच तत्काळ गाडी रस्त्याच्या कडेला घेऊन गाडीतील प्रवाशांना खाली उतरवले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून या आगीत गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. नेमकी आग कशामुळे लागली, हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. भूईज पोलिसांनी अग्निशमन दलाला बोलावून तासाभरात आग आटोक्यात आणली. या घटनेची नोंद भूईज पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलीस आगीचे कारण शोधत आहेत.