मुंबई - सोशल मीडिया इन्फ्लुएंजर धनश्री वर्मा आणि क्रिकेटपटू युजवेंद्र चहल त्यांच्या कथित घटस्फोटाच्या बातमीमुळे चर्चेत आहेत. धनश्री आणि युजवेंद्रमध्ये सध्या काही ठीक चालले नाही. लवकरच दोघांचा घटस्फोट होऊ शकतो. युजवेंद्र आणि धनश्रीनं इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं आहे. युजवेंद्र चहलनं धनश्रीबरोबरचे फोटो सोशल मीडियावर काढून टाकले आहेत. आता घटस्फोटाच्या अफवांमध्ये, धनश्री पहिल्यांदा एका ठिकाणी स्पॉट झाली आहे. पापाराझीनं जसे धनश्रीचे फोटो काढण्यासाठी सुरुवात केली, त्यानंतर तिनं फोटो न काढण्याची विनंती केली. सध्या सोशल मीडियावर धनश्रीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
घटस्फोटाच्या बातमीदरम्यान धनश्री वर्मा झाली स्पॉट : या व्हिडिओमध्ये धनश्री पापाराझींना म्हणते, ''आता पुरे झाले.'' यादरम्यान ती स्टायलिश अंदाजात दिसली. तिनं पांढरा शर्ट आणि काळ्या रंगाचा स्कर्ट परिधान केला होता. यावर तिनं केस मोकळे सोडले असून उंच टाचांची हिल्स घातली होती. या लूकला आणखी खास बनविण्यासाठी तिनं काळ्या रंगाचा चष्मा घातला होता. आता धनश्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. आता धनश्रीला सोशल मीडियावर अनेकजण ट्रोल करत आहेत. एका यूजर्न या व्हिडिओच्या कमेंट विभागात लिहिलं, 'लग्नापूर्वी हिला कोणी ओळखत होतं का ?' दुसऱ्या एकानं लिहिलं, '60 कोटींची मागणी केली आहे का ?' आणखी एकानं लिहिलं, 'पूर्ण इंडिया हिला चहलमुळे ओळखतो.'
युजवेंद्र चहल 'बिग बॉस 18' मध्ये पोहोचला : धनश्रीच्या आधी युजवेंद्र चहल 'बिग बॉस 18'च्या सेटवर दिसला होता. युजवेंद्रबरोबर श्रेयस अय्यर आणि शशांक सिंहदेखील होते. यावेळी चहलनं सलमान खान आणि स्पर्धकांबरोबर खूप मजा केली. दरम्यान धनश्री वर्माच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तिनं 'झलक दिखला जा 11'मध्ये प्रवेश केला होता. या शोमध्ये धनश्रीनं वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. धनश्रीला पाठिंबा देण्यासाठी युजवेंद्र चहल देखील शोमध्ये आला होता. यावेळी त्यानं धनश्री आणि त्याच्या आयुष्याशी संबंधित काही गोष्टी शेअर केल्या होत्या. यावेळी त्यानं सांगितलं होतं की तो धनश्रीला प्रेमानं भिंडी म्हणतो. सध्या युजवेंद्र आणि धनश्रीनं आपल्या घटस्फोटाबद्दल काहीही विधान केलं नाही.
हेही वाचा :