नवी दिल्ली Army Day 2025 : आपल्या सैन्यातील सैनिकांच्या अदम्य धैर्याबद्दल आणि त्यांच्या शौर्याच्या गाथांविषयी तुम्ही अनेक कथा ऐकल्या असतील. आपल्या जीवाची पर्वा न करता देशाच्या शत्रूंशी लढणाऱ्या शूर सैनिक आणि शहीदांच्या स्मरणार्थ दरवर्षी 15 जानेवारी रोजी 'आर्मी दिवस' साजरा केला जातो. पण तुमच्यापैकी फार कमी लोकांना माहिती असेल की अनेक प्रसिद्ध खेळाडू देखील सैन्याशी संबंधित आहेत. यात सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, अभिनव बिंद्रा ते नीरज चोप्रा यांच्यापर्यंतच्या महान खेळाडूंचा समावेश आहे.
On #ArmyDay2025, greetings and warm wishes to our valorous Indian Army personnel and their families. The Indian Army is known for its courage, bravery, sacrifice and professionalism. Their unwavering commitment to protect the nation and help the citizens during natural calamities…
— Rajnath Singh (@rajnathsingh) January 15, 2025
15 जानेवारीलाच का साजरा केला जातो सैन्य दिवस : ब्रिटिश राजवटीनंतर, हा भारताच्या लष्करी इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा होता. जनरल करिअप्पा यांनी 15 जानेवारी रोजी भारतीय सैन्याची सूत्रे हाती घेतली. म्हणून दरवर्षी 15 जानेवारी रोजी सैन्य दिन साजरा केला जातो. सैन्य दिनानिमित्त दिल्लीतील करिअप्पा परेड ग्राउंडवर एक भव्य परेड आयोजित केली जाते. यात भारतीय सैन्य आपली आधुनिक शस्त्रे आणि उपकरणे प्रदर्शित करते. याशिवाय या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम, सैनिकी सराव आयोजित केले जातात आणि लोकांना शौर्य पुरस्कार देखील दिले जातात. सैन्य दिनानिमित्त देशभरात कार्यक्रम आयोजित केले जातात, जिथे लोक शहीदांना श्रद्धांजली वाहतात.
धोनी-अभिनव लेफ्टनंट कर्नल : माजी भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी आणि नेमबाज अभिनव बिंद्रा यांनी त्यांच्या खेळांद्वारे जगभरात प्रसिद्धी मिळवली आहे. हे दोन्ही दिग्गज क्रीडापटू लेफ्टनंट कर्नल पदावर आहेत. 2011 मध्ये भारतीय प्रादेशिक सैन्याच्या (106 पॅरा टीए बटालियन) पॅराशूट रेजिमेंटमध्ये एमएस धोनीला मानद पद देण्यात आलं. तर 2008 च्या बीजिंग ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या अभिनवला 2011 मध्ये प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नल पद देण्यात आलं. भारताला पहिला वनडे विश्वचषक मिळवून देणारे माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू कपिल देव यांनीही भारतीय सैन्यात सेवा बजावली आहे. 2008 मध्ये, ते इंडियन टेरिटोरियलमध्ये सामील झाले. सैन्यानं त्यांना एक आदर्श म्हणून सामील केलं होतं.
सचिन तेंडुलकर हवाई दलात ग्रुप कॅप्टन : 'क्रिकेटचा देव' म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर हा भारतीय संघाचा कर्णधारही राहिला आहे. तसंच तो भारतीय हवाई दलात ग्रुप कॅप्टन देखील आहे. हे पद विंग कमांडरच्या पदापेक्षा वरचं आहे. क्रिकेटमधील योगदानाबद्दल 2010 मध्ये भारतीय सैन्यानं सचिन तेंडुलकरला हा सन्मान दिला होता.
निरजही आहे सुभेदार : यांच्यासोबतच 2020 च्या टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्ण आणि 2024 च्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक जिंकणारा प्रसिद्ध धावपटू नीरज चोप्रा देखील सैन्यात आहे. हा सन्मान नीरजला 2016 मध्ये देण्यात आला होता. तो राजपुताना रायफल्स युनिटमध्ये ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर (जेसीओ) नायब सुभेदार पदावर आहे.
Today, on Army Day, we salute the unwavering courage of the Indian Army, which stands as the sentinel of our nation’s security. We also remember the sacrifices made by the bravehearts who ensure the safety of crores of Indians every day. @adgpi pic.twitter.com/LZa36V0QZf
— Narendra Modi (@narendramodi) January 15, 2025
हेही वाचा :