ETV Bharat / entertainment

अमिताभ बच्चनची नात नव्या नवेली नंदानं गुजरातमधील सुंदर फोटो केले शेअर... - NAVYA NAVELI NANDA

अमिताभ बच्चनची नात नव्या नवेली नंदा सध्या गुजरातमध्ये सुंदर सुट्टी घालवत आहे. आता तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

navya naveli nanda
नात नव्या नवेली नंदा (navya naveli nanda - Getty Images)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 15, 2025, 11:54 AM IST

मुंबई - बॉलिवूड स्टार किड्ससाठी ग्लॅमरच्या जगात आपले स्थान निर्माण करणे, हे फार कठिण नाही. स्टार किड त्याच्या कुटुंबामुळे नेहमीच प्रसिद्धीझोतात असतात. आता एक अशाचं एका व्यक्तीबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जी आपल्या कुटुंबामुळे नेहमीच चर्चेत असते. या स्टार किड्सनी त्यांच्या कुटुंबाचा मार्ग सोडून चित्रपट जगताऐवजी व्यवसायात आपले करिअर केले आहे. अमिताभ बच्चनची नात आणि श्वेता बच्चनची मुलगी नव्या नवेली नंदा ही चांगली एक उद्योजक आहे. दरम्यान ती तिच्या फोटोमुळे चर्चेत आली आहे. तिनं शेअर केले फोटो सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल झाले आहेत.

नव्या नवेली नंदानं शेअर केले सुंदर फोटो : नव्या नवेली गुजरातमधील कच्छमध्ये दौरा करत असून ती तिच्या आजी जया बच्चन आणि आई श्वेता बच्चनबरोबर आहे. नव्यानं तिच्या फोटोमध्ये कच्छच्या रणाचे दृश्य तिच्या चाहत्यांना दाखवले आहे. नव्यानं सोशल मीडियावर शेअर केले फोटो खूप आकर्षक आहेत. नव्या नवेली नंदाचे वडील निखिल नंदा हे देखील एक मोठे उद्योगपती आहेत. त्यांची संपत्ती देखील हजारो कोटीमध्ये आहे. आता नव्या देखील आपल्या वडिलांप्रमाणे व्यवसायत करिअर करत आहे. नव्याचे शालेय शिक्षण लंडनमधील सेव्हनॉक्स स्काऊस येथून झाले आहे. यानंतर तिनं फोर्डहॅम विद्यापीठातून डिजिटल तंत्रज्ञानात पदवी प्राप्त केली. नव्यानं स्वत:चे स्टार्टअप सुरू केले आहे.

नव्या नवेली नंदाबद्दल : नव्या सध्या आयआयएम अहमदाबादमधून तिचा मास्टर्स कोर्स करत आहे. अनेकदा ती आपल्या कॉलेज कॅम्पसमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अलीकडेच तिनं तिच्या कॉलेजमधील फ्रेंड्सबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोत ती खूप साधी दिसत होती. दरम्यान नव्या नवेली नंदा ही बॉलिवूड स्टार किड्समध्येही खूप लोकप्रिय आहे. जान्हवी कपूर तर सुहाना खान आणि अनन्या पांडेपर्यंत प्रत्येकजण नव्याचा चांगल्या मैत्रिणी आहेत. नव्यानं तिच्या मैत्रिणींपासून दूर जाऊन स्वतःचे करिअर घडवण्याचा निर्णय घेतला. नव्याचा भाऊ अगस्त्य नंदानं देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. अगस्त्यला त्याच्या आजोबांप्रमाणे हिरो व्हायचे आहे. त्यानं 'द आर्चीज' या चित्रपटामध्ये काम केलं आहे. त्याचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता.

हेही वाचा :

  1. आयआयएममध्ये प्रवेशावरून ट्रोल करणाऱ्यांना नव्या नवेली नंदानं दिलं चोख प्रत्युत्तर - Navya Naveli and iim ahmedabad
  2. आराध्या बच्चनबद्दल आत्येबहीण नव्या नवेलीची भन्नाट प्रतिक्रिया, पॉडकास्टमध्ये केलं नव्या पिढीचं गुपित उघड... - Navya Nanda talk about Aaradhya
  3. सुहाना, अनन्या आणि शनायानं बेस्ट फ्रेंड नव्या नवेलीवर केला प्रेमाचा वर्षाव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.