महापारेषणच्या मदतीला आधुनिक 'ड्रोन', देशातील पहिलाच प्रयोग यशस्वी - मंत्री नितीन राऊत
🎬 Watch Now: Feature Video

दुर्गम आणि उंच भागात असलेल्या महापारेषणच्या अति उच्च दाबाच्या यंत्रणेची देखभाल आणि दुरुस्ती करणं कायमच आव्हानात्मक असतं. या प्रकारची कामं करतांना अनेक लाईनमनचे प्राणही गेले आहेत. पण, आता या कामांसाठी ड्रोनची मदत घेतली जाणार आहे. ही सर्व कामे ड्रोनच्या साहाय्याने पूर्ण केली जाणार आहेत. देशातील हा पहिलाच प्रयोग आहे. विशेष म्हणजे, नागरी हवाई संचालनालयाने अर्थात 'डीजीसीए'ने देखील याला मान्यता दिली आहे.