'वाजपेयी हिंदुत्ववादी होते पण धर्मांध नव्हते'; अटलजींच्या जयंतीनिमित्त संजय राऊतांची प्रतिक्रिया
🎬 Watch Now: Feature Video
भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती ( Atal Bihari Vajpayee Birth Anniversary ) आहे. त्यांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ( Sanjay Raut on Atal Bihari Vajpayee ) अभिवादन केले. अटलबिहारी वाजपेयी हे उत्तम संसदपटू होते. माणुसकी, मानवता काय असते हे आम्ही त्यांच्याकडून शिकल्याचे संजय राऊत म्हणाले. बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी यांचं अत्यंत जिव्हाळ्याचं नातं होतं. हिंदुत्वावर भाजप शिवसेनेची युती झाली त्याला अटल बिहारी वाजपेयी यांनी मोठं योगदान असल्याचे राऊत यांनी सांगितले. वाजपेयी हिंदुत्ववादी होते पण धर्मांध नव्हते, असेही राऊत म्हणाले.