नरभक्षक बिबट्याचा खात्मा करणारे डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांचे अकलूजमध्ये जंगी स्वागत - Dr. Dhavalsinh Mohite-Patil Killed Leopard
🎬 Watch Now: Feature Video

पंढरपूर (सोलापूर) - अहमदनगर, बीड आणि सोलापूर या तीन जिल्ह्यात थैमान घातलेल्या नरभक्षक 'सोनबा' बिबट्याला डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी निशाणा करत ठार केले. वांगी नं.चार रांखुडे वस्तीवर पांडुरंग रांखुडे यांच्या केळीच्या बागेत बिबट्याला ठार करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून या नरभक्षक बिबट्यामुळे करमाळा तालुक्यात दहशत पसरली होती. या बिबट्याने अहमदनगर, बीड, सोलापूर जिल्ह्यात बारा जणांचा बळी घेतला होता. सोनबा बिबट्याला डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी निशाणा करत शिकार केली. यानंतर डॉ. धवलसिंह यांचे अकलूजमध्ये ढोल वाजवून आणि फटाक्यांच्या आतषबाजी करत जंगी स्वागत करण्यात आले.