पुण्यातील राजगुरूनगरमध्ये १४४ कलम लागू - खेड लेटेस्ट न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
खेड (पुणे) - खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्यावरील अविश्वास ठराव व त्यानंतर राजकीय घडामोडींना हिंसक वळण आले होते. त्या पार्श्वभूमीवर राजगुरूनगरमध्ये १४४ कलम लागू करण्यात आले आहे. तसेच स्थानिक पोलिसांसह, राज्य राखीव दल व दंगा नियंत्रण पथकाचा तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे. अविश्वास ठरावरील बैठक सभागृहात सुरू असल्याने, राजगुरुनगरला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.