संग्राम आमचा विद्यार्थी होता याचा अभिमान; मित्रांसह शिक्षकांनी आठवणी केल्या ताज्या - भारतीय जवान संग्राम पाटील वीरमरण
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - कोल्हापुरातल्या निगवे खालसा गावातील सुपुत्र संग्राम पाटील यांना पाकिस्तानच्या हल्ल्यात वीरमरण आले. आज सकाळी 10 वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या गल्लीतल्या व्यक्तीने देशासाठी प्राणांची आहुती दिली याचा अभिमान आता शेजारी राहणाऱ्या मुलांना तर आहेच, शिवाय संग्राम दादा आता आम्हाला पुन्हा कधीच भेटणार नाही याचं मोठं दुःखसुद्धा मुलांच्या मनात आज पाहायला मिळाले. शिवाय संग्राम यांच्या शिक्षकांनासुद्धा 'तो' आपला विद्यार्थी होता याचा अभिमान असल्याचे काही शिक्षकांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले आहे. याबाबत अधिक माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी...