exclusive : पोल्ट्री व्यावसायिकांच्या समस्या मांडण्यासाठी समरजितसिंह यांनी हाती घेतला 'ईटीव्ही भारत'चा बूम - समरजितसिंह घाटगे
🎬 Watch Now: Feature Video

कोल्हापूर - कोरोनाचा प्रसार सर्वत्र होत असतानाच दुसरीकडे पोल्ट्री व्यावसायिकांना कोट्यवधीच्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे चिकन खाल्ल्याने कोरोना होत नाही याची जणजागृती करणे गरजेचे आहे. कोरोना विषाणू म्हणजे काय? तो कसा पसरतो? आणि काही गैरसमज पसरल्यामुळे चिकन व्यवसायावर झालेल्या परिणामाबाबत सद्या जी दक्षता घेणे गरजेचे आहे, यासंदर्भात कोल्हापुरातील डॉ. अर्जुन अडणाईक आणि डॉ. संदीप पाटील यांची स्वतः समरजितसिंह घाटगे यांनी 'ईटीव्ही भारत'चा बूम हातात घेऊन मुलाखत घेतली.