VIDEO : शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सदाभाऊ खोत यांनी केली महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीका - सदाभाऊ खोत यांनी केली महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीका
🎬 Watch Now: Feature Video
सांगली - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना सदाभाऊ खोत यांनी खोचक शब्दात वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. नेत्यांच्या खाऊगिरीमुळे महाराष्ट्राच्या जनतेला आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. पवार साहेबांनी त्यांच्या चेल्यांच्या मुसक्या आवळून खायचे बंद कराण्याचा सल्ला द्यावा, अशा शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच राज्यातील आरोग्य आणि गृहनिर्माण खात्याच्या परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी येत्या अधिवेशनात जाब विचारू असा, इशाराही आमदार खोत यांनी दिला आहे.