Kalyan Railway Station : धावत्या रेल्वेखाली जाणाऱ्या प्रवाशाचे आरपीएफ जवानाने वाचवले प्राण; थरार सीसीटीव्हीत कैद - सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14400289-1041-14400289-1644249250598.jpg)
ठाणे - कल्याणच्या रेल्वे स्थानकात ( Kalyan Railway Station ) काळजाचा ठोका चुकविणारी घटना घडली आहे. धावत्या एक्स्प्रेसमध्ये चढताना एका प्रवाशाचा तोल जाऊन रेल्वे फलाटाच्या गॅपमध्ये जात असताना रेल्वे स्थानकात कर्तव्य बजावणाऱ्या एका आरपीएफ जवानाने ( RPF Personnel ) तत्परतेने धाव घेत, त्या प्रवाशाचे प्राण वाचवले. हा धक्कादायक प्रकार रेल्वेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सोनललाल ईटाह, असे त्या प्रवाशाला वाचविणाऱ्या देवदूत आरपीएफ जवानाचे नाव आहे.