कोल्हापूरचा शाही दसरा मोठ्या थाटामाटात संपन्न - royal dussehra of kolhapur celebrated
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा कोल्हापुरचा शाही दसरा आज मोठ्या उत्साहात आणि राजेशाही थाटात पार पडला. या सोहळ्यासाठी श्रीमंत शाहू छत्रपती, श्रीमंत संभाजीराजे छत्रपती, श्रीमंत मालोजीराजे छत्रपती उपस्थित होते. त्याचबरोबर युवराज शहाजीराजे राजकुमारी यशस्विनी राजे यांची देखील उपस्थिती होती. पालकमंत्री सतेज पाटील,ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला. श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते शमी पूजन झाल्यानंतर सोने लुटण्याचा सोहळा पार पडला. दरम्यान या शाही दसऱ्यासाठी श्री करवीर निवासिनी अंबाबाई देवीची पालखी मोठ्या थाटामाटात वाजत-गाजत दसरा चौक येथे आणण्यात आले. तसेच भवानी मंडप येथील अंबादेवी घराण्यातील पालखी देखील या सोहळ्यासाठी आणण्यात आली होती. यावेळी फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होता.