#पॉवरकट : वीज पुरवठा खंडीत झालेल्या घटनास्थळाचा आढावा - mumbai power cut news
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे - महापारेषणच्या 400 किलोव्हॅट कळवा पडघा जीआयएस केंद्रात सर्किट 1 देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट 2 वर होता. मात्र, सर्किट 2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई व ठाणेमधील बहुतांश भाग प्रभावित होता. आता टप्प्या-टप्प्याने ही सेवा सुरळीत करण्यात आली आहे. आणखी तासभराच्या कालावधीत पूर्णत: सेवा सुरळीत होणार आहे. ठाण्यात या प्रकारामुळे पाणी पुरवठा पूर्णत: ठप्प झाला आहे. पम्पिंग स्टेशन बंद झाल्याने ही समस्या सुरळीत होणार आहे.