VIDEO: दसरा मेळावा आणि शिवसैनिकांचं नातं, ऐका शिवसैनिकाकडूनच - relation between dussehra melawa and shivsainik
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : दसरा आणि शिवसैनिक यांचा एक वेगळं नात आहे. या दिवशी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं सोनं लुटण्यासाठी शिवसैनिक शिवाजी पार्क मैदानात जमत होते. त्या आठवणी अजूनही शिवसैनिकांच्या मनांमध्ये ताज्या आहेत. सध्या कोरोना असल्यामुळे ऑनलाईन माध्यमातून उद्धव ठाकरे दसरा मेळावा घेत आहे. मात्र लवकरात लवकर कोरोनाचे सावट दूर होईल आणि पुन्हा एकदा तशाच पद्धतीने दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानात शिवसैनिकांची गर्दी होईल असा विश्वास शिवसैनिकांमध्ये आहे. दसरा मेळाव्याशी शिवसैनिकांचे नेमकं काय नात आहे हे ज्येष्ठ शिवसैनिक आप्पासाहेब पाटील यांच्याकडून जाणून घेतले आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी.