पुरानंतरचं चिपळूण : सरकारी मदत नाही मिळाली तरी चालेल, पण आम्हाला ताकद द्या; व्यापाऱ्यांची व्यथा - chiplun flood rescue
🎬 Watch Now: Feature Video
रत्नागिरी - चिपळूणमधल्या पुराने बाजारपेठेतील व्यापारी पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे. दुकानात 10 ते 15 फूट पाणी असल्यामुळे सर्वच मालाचे नुकसान झाले आहे. आता पाणावलेल्या डोळ्यांनी व्यापारी साफसफाई करताना दिसत आहेत.. भावना व्यक्त करताना त्यांना अश्रू अनावर होत आहेत. आम्हाला सरकारी मदत नाही मिळाली तरी चालेल, पण आम्हाला आमच्या पायावर उभं राहण्यासाठी ताकद द्या, आम्हाला बिनव्याजी कर्ज द्या, ते आम्ही फेडायला तयार आहोत, पण आम्हाला धीर द्या, अशी व्यथा व्यापारी मांडतायेत.