तौक्ते चक्रीवादळाच्या पावसामुळे वसई-विरारकरांची दैना - तौक्ते चक्रीवादळ
🎬 Watch Now: Feature Video
पालघर/विरार - तौक्ते चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी खूप नुकसान झाले आहे. 30पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर वसई-विरारमध्ये रौद्र रूप धारण केलेल्या चक्रीवादळाच्या पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, शहरात साचलेल्या पाण्याचा अद्याप निचरा झालेला नाही. अनेक रहिवासी संकुलांत पावसाचे पाणी शिरले आहे. परिणामी तीन दिवसांपासून नसलेली वीज व त्यामुळे येणाऱ्या अडचणीमुळे नागरिकांचे हाल होत आहेत.