Union Budget 2022 : अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी झालेली तरतूद आशादायी : सेवानिवृत्त कर्नल पटवर्धन - आत्मनिर्भर भारत
🎬 Watch Now: Feature Video

नागपूर - अर्थसंकल्पात ( Union Budget 2022 ) संरक्षण क्षेत्रासाठी खूप मोठी वाढ झाली नसली ( Defence Budget 2022 ) तरी, आशादायी चित्र निर्माण झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत अर्थसंकल्पात 15 ते 20 टक्के वाढ होईल अशीच आशा आहे. यात कॅपिटल बजेटच्या ( Capital Budget 2022 ) 68 टक्के निधी संरक्षण क्षेत्राच्या खर्चासाठी ठेवण्याची घोषणा केली आहे. यात जवळपास 25 टक्के खर्च हा रिसर्च डेव्हलपमेंटवर होणार आहे. भारत आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल उचलले असले तरी, याचा फायदा होण्यासाठी किमान पाच ते सहा वर्ष लागतील. त्यानंतर या क्षेत्रात बदल आपल्याला दिसून येईल अशी माहिती सेवानिवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी ईटीव्ही भारताशी बोलताना दिली आहे.