VIDEO : अमरावतीत त्रिपुरा हिंसेचा निषेध; मोर्चाला हिंसक वळण, दुकानांची तोडफोड - अमरावतीत दुकानांची तोडफोड

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 13, 2021, 2:20 AM IST

Updated : Nov 13, 2021, 1:52 PM IST

अमरावती - त्रिपुरा राज्यात झालेल्या हिंसाचाराच्या (Tripura violence) घटनेच्या निषेधार्थ अमरावती (Amravati) शहरातील एका समाजाच्या जवळपास २० हजार बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा (Tripura violence Protest) काढला. या मोर्चा दरम्यान काही मोर्चेकरांनी जयस्तंभ चौकातील बालाजी मंदिर परिसरात उघड्या असणाऱ्या दुकानांवर दगडफेक करून तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावेळी मोर्चेकरांनी दुचाकीचीही तोडफोड केली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून नुकसान झालेल्या दुकानदारांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान यावेळी आंदोलकानी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) व भाजपा विरोधी घोषणा आणि दुकानांची झालेली तोडफोड यावरून आता भाजपाची (BJP) आक्रमक झाली आहे. दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान तोंडफोड करणाऱ्या मोर्चेकऱ्यांना अटक करावी अशी मागणी दुकानदारांनी केली आहे.
Last Updated : Nov 13, 2021, 1:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.