टाटा ग्रुपला हस्तांतरित झाल्यामुळे भविष्यात एअर इंडियाला चांगला फायदा होईल- प्रफुल्ल पटेल - एअर इंडिया
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - आयकर विभागाच्या करवाईबद्दल मी काही बोलणार नाही. मात्र जे काही घडले त्याबद्दल पवार साहेबांनी वक्तव्य केले आहे. एअर इंडियाच्या खाजगीकरण करत परत टाटा ग्रुपला दिला आहे. त्या गोष्टींचे समर्थन करतो. एअर इंडिया टाटा ग्रुपला हस्तांतरित झाल्यामुळे नक्कीच भविष्यात एअर इंडियाला चांगला फायदा होईल, असेही प्रफुल्ल पटेल म्हणालेत. ते नागपूरत विमानतळावर बोलत होते. गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवार यांच्या जवळच्या लोकांवरील आयकर विभागाच्या गाडीबद्दल शरद पवार साहेबांनी योग्य वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता त्याच्या पलीकडे जाऊन मी काही बोलणे योग्य नाही. तसेच जे होईल त्या परिस्थितीचा सामना करू, असेही माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल म्हणालेत.