तस्मै श्री गुरवे नमः : गुरूपौर्णिमेच्या दिवशी जाणून घ्या कोण आहेत विश्वास नांगरे पाटलांचे गुरू - गुरुपौर्णिमेबद्दल विश्वास नांगरे पाटील
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक - आज गुरुपौर्णिमा आहे. त्यानिमित्ताने तस्मै श्री गुरवे नमः ही मालिका घेऊन आलोय. त्याद्वारे आज नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आपल्या गुरूबद्दल माहिती सांगितली आहे. मी एका खेड्यातून समोर आलो आहे. मी जिल्हा परिषद शाळेतून शिकलो आहे. तेथील शिक्षकांनी मला घडवले. माझे आई-वडील माझे गुरू आहेत. त्यांनी मला घडवले. गुरू खूप पांडित्यपूर्ण असला पाहिजे असा नाही. त्याने संस्कार केले पाहिजे. गुरूच्या वाणीमध्ये आणि कृतीमध्ये फरक नसावा, असे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले.